Monday, December 24, 2012


आपल्या आयुष्यात आपण किती dos आणि donts ठरवत असतो न... हे नाही करायचं ते नाही करायचं ...हे योग्य आहे का ते अयोग्य आहे का ? आणि बरंच काही... प्रत्येकाची जगण्याची style वेगळीच असते नाही !! काहीजण स्वतःभोवती एक चौकट आखून ठेवतात त्या पलीकडे ते कोणतीही गोष्ट करतही नाही आणि करायला त्यांना आवडतही नाही. तर काहींच आकाश संपतच नाही त्यांना ना बंधन आवडतात ना ते कोणालाही बांधून ठेवत ...स्वैर, स्वच्छंद मोकळ असत त्याचं आयुष्य (त्यांच्या भाषेत) .... पण मला ना चौकट आवडत नाही खूप जास्त मोकळ आवडत ...मला आयुष्य समुद्रसारखं आवडत ..... खोल, अथांग, स्वच्छ, अमर्याद .....तरीही कुठेतरी किनाऱ्याशी जोडलेले ....सगळ्यांना त्यात सामावून घेणारे...कधी शांत तर कधी खवळलेले.....

1 comment: