Monday, December 24, 2012


कसं असत न .......जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा कसं आपण स्वतःला आकसून घेतो ....एखादी गोष्ट समजत असूनही कळत नसल्यासारखेच वागत असतो. खरतर काही समजून घ्यायची इछाच नसते अशावेळी.....मग सगळ जग कसं आपल्या विरोधात गेल्यासारखं वाटत ......मी एकटीच / एकटाच आहे असा गैरसमज करून घेतो. कारण अशावेळी आपल्याला आपल्या दुःखाशिवाय दुसर काहीही दिसत नसत ....मग मलाच कसं सगळ्यांनी एकट टाकल आहे आणि मी कसा एकटाच लढत आहे एवढंच आपल्याला दिसत असत ............पण आपण हे कसे विसरतो कि असे प्रसंग दुसर्यांच्याही आयुष्यात झालेले असू शकतात आणि त्यांनीही आपल्यासारखाच त्रास सहन केलेला असू शकतो. मान्य आहे अशावेळी मन काहीही ऐकायला तयार नसत पण त्याला समजावण आपल्याच हातात आहे. डोक शांत ठेऊन जर मोकळ्या आभाळात वर पाहिलं तर कळेल अजून बरंच काही बाकी आहे अन जिंकायला हे आभाळही अपुर आहे.

No comments:

Post a Comment