तो सैरभैर होऊन संपूर्ण लेडीज डब्बा शोधत होता ...त्याने दिवसभरात कमावलेले साडे नऊशे रुपये त्याच्याकडून चक्क हरवले होते..तो प्रत्येक बाकाखाली वेड्यासारखा सारखा सारखा शोधत होता....आता तर त्याला रडूच कोसळले आणि एकटाच वेड्या सारखा बडबडत होता," आज कि कमाई के पैसे थे सारे..कल का माल कैसे खरीदुंगा?" कपाळावर हात मारून रडायलाच लागला...गाडीतल्याच बायांना शेवटी त्याची दया आली आणि त्यांनीच मग थोडे पैसे जमा केले आणि त्याच्या हातात बळजबरीने पैसे ठेवले, म्हणाल्या " उद्याचा माल घे या पैशांनी..."
याच का त्या बाईका ज्या डब्ब्यात येणाऱ्या विक्रेत्यामुळे त्रासलेल्या असतात.."आम्ही कसे बसे चवथ्या सीटवर बसतो आणि त्यात हे मेले सारखे ये जा करत असतात." म्हणून ओरडत असतात. नाहीतर पाच रुपयांसाठीही विक्रेत्याबरोबर हुज्जत घालत असतात याच का त्या बाईका ? ..त्या वेळी गम्मत वाटली मला त्यांची.. या वेळ आल्यावर दयाळूही होऊ शकतात तर!!
पण तो मुलगा? तो खरच बोलत होता का नाटक करत होता पैशांसाठी? राहून राहून सारखा मनात तेच येत होत..तो जर खरच बोलत असेल तर त्याला आज लेडीज डब्ब्यात देवच भेटला म्हणायचा नाहीतर त्याच्या खोटारडेपणामुळे या बाईकांनी आज एका चुकीच्या माणसाला मदत केली असंच समजायचं...
काही का होईना!! अजूनही माणुसकी शिल्लक आहे याची जाणीव झाली आज !!
No comments:
Post a Comment