राग !! खरंच खूप राग साचून राहिला आहे का माझ्या मनात ? हो कदाचित ...लहानपणापासून आतापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा .....म्हणूनच आजकाल मला सहन होत नाही काहीही चुकीच घडल कि कारण आधी खूप जास्तच सहन केल आहे.
पण हा राग खूप वाईट आहे. तो आपल्याबरोबर सगळ्यांनाच जाळतो त्यात ... खरचं , कुणाला माफ कारण इतकं सोप्पं असत का? मला नाही जमत माफ करायला...इतकी काही मी चांगली नाही ...
खरचं कधीच कुणाला राग आला नसता तर ....किती चांगल झाल असतं न....कधीही भांडण , द्वेष राहिले नसते कोणाहीमध्ये ...
No comments:
Post a Comment