जग किती छोट असत न.... गर्दीतही काही चेहरे ओळख दाखवणारे तर काही ओळख लपवणारे दिसतात ...गर्दीतले काही गंध , स्पर्श नकोसे वाटतात तर काही हवेहवेसे जुनी आठवणं पुन्हा ताजी करून जाणारे असतात. किती दूर गेले तरी फिरून पुन्हा एका अनोळख्या वळणावर असे काही जुने ओळखीचे चेहरे समोर येतात....आणि काहीसे अस्वस्थ करून जातात ...
सगळ्यांच्याच आयुष्यात अशा काही व्यक्ती असतात ज्यांना तुम्ही कधीही कितीही दिवसांनी भेटलात तरी खूप छान वाटते, त्यांना पुन्हा पुन्हा भेटावेसे वाटते तर काही असेही असतात ज्यांना आपण दुरून पहिले तरी आपण स्वतःच त्यांच्यापासून लांब जातो ...खरतर आपल्याला काही लोकांच्या प्रश्नांची उत्तर द्यायची नसतात म्हणून जाणून बुजून आपणच स्वतःला गर्दीचा एक भाग बनवून टाकतो ....
No comments:
Post a Comment