कशी असते न नियती !! नेहमीच कशी मोजूनमापून देते साऱ्या गोष्टी ...सगळ्यांनाच नेहमी हातच राखून देते ती...कोणाला माणस देते तर प्रेम देत नाही , कुणाला प्रेम देते तर सहवास देत नाही, कुणाला अमाप पैसा देते तर सुखाची झोप देत नाही , नेहमीच "दात आहे अन चणे नाही अन चणे आहेत अन दात नाहीत" अशीच काहीशी परिस्थिती असते ...
का कुणाला त्याच्या मनासारख्या गोष्टी नाही मिळत ...नेहमीच का अपूर्ण - अधुऱ्या गोष्टी मिळतात ? कदाचित आपल्या जवळ असलेल्या गोष्टींची किंमत वाटावी म्हणून असेल ... सहज मिळालेल्या गोष्टींना फारशी किंमत नसते अन अशाच मेहनतीने मिळालेल्या गोष्टी टिकवून ठेवण्यासाठीच कदाचित हि नियती त्या गोष्टी अपूर्ण ठेवते ....
माझ्या प्रश्नानसारख्या ......
No comments:
Post a Comment