लहान मुल किती निरागस असतात नाही...... त्यांच प्रेम आपलेपणा अगदी सहज असतो....वयान जरी लहान असले तरी त्यांच मन किती मोठ असत ...सगळ्यांना सामावून घेणार अगदी मनापासून.....का मोठ्यांची मन अशी नसतात ? का त्यांना सहज कोणालाही आपलस करता येत नाही? का ते मनापासून स्वीकारत नाहीत सगळ्यांना ? लहान मुलांना फक्त मनाचा मोठेपणा दिसतो अन मोठ्यांना दिसतो तो फक्त पैशांचा मोठेपणा ....लहान मुलांचं आयुष्यही किती साध अन सरळ असत कसला त्रास नाही कसला विचार नाही बस आपल्याच विश्वात गुंग होऊन जायचं .....हवी तेवढी मस्ती करायची अन सगळ्यांना आपलास करायचं .....मलाही लहान व्हायचं परत एकदा ......
No comments:
Post a Comment